संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्या कडुन उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करा

 

ऋषी सहारे
संपादक

जिल्ह्यातील अनेक वयोवृद्ध व अपंग, विधवा महिला ना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजने चा लाभ मिळत आहे. सदर योजने अंतर्गत एक हजार ते बाराशे रुपये मिळतात.माहागाईच्या काळात हि आर्थिक मदत पुरेसे नाही तरी पन अनेक वयोवृद्ध, अपंग, विधवा महिलांना हा मोठा आधार आहे.भारतीय संविधानात या निराधाराना आर्थिक मदत करन्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवर दिलेली आहे.सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक अडचणी आहेत.अनेक जाचक अटि मुळे अनेक लाभार्थी या योजनांपासून वंचित आहेत.असे असतानी ज्याना अनुदान मिळत आहे त्याचे अनुदान बंद करन्याचा डाव चालु आहे.ज्याचे अर्ज पात्र आहेत ज्याना अनुदान मिळत आहे अशा अपंग, निराधार वयोवृद्ध लोकांना परत विनाकारण चे प्रमाणात तहसील कार्यालयाने मागने सुरू केले आहे. एकदा पात्र झालेल्या अपंग, निराधार वयोवृद्ध लोकांना उत्पन्न चा दाखल्याची मागनी करने मनजे या गरीब निराधार वयोवृद्ध, अपंग, विधवा महिलानवर अन्याय आहे.
सदर उत्पन्नाचे दाखले मागु नये अशी मागनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिन कॉ.अमोल मारकवार ,प्रहार चे निखील धार्मिक, मनसे चे रंजित बनकर व निराधार युनियन चे सभासदानी केली आहे.