वनश्री महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबीर संपन्न

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची
दिनांक 12/1/2021
स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी या शिबिरात महाविद्यालयातील
प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा येथील डॉ. दिक्षा बोदेले, नर्स तेजस्विनी उईके, भाग्यवान बांडे यांच्या पथकाने हे लसीकरण करून घेतले. यावेळी १५ ते १८ वयोगटातील एकूण ४४ विद्यार्थ्यांना कोव्हक्सीन लस देण्यात आली. यावेळी वनश्री महाविद्यालयातील प्रा. विनायक , प्रा. बनसोडे , प्रा. वालदे व कर्मचारी उपस्थित होते.