द व्हाईट एस्कॅसी लघु चित्रपटातून सावर्डेची सुकन्या बालकलाकार सारा पाकळे हिची सिनेसृष्टीत दमदार इंन्ट्री शासनाच्या हिरकणी कक्षाची जनजागृती करणारा महत्वांकांक्षी लघु चित्रपट.

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : अनाथ बालकाला आपल्या मातेच्या दुधाचे महत्व काय असते हे पटवून देत शासनाच्या हिरकणी कक्षाविषयी समाजात जनजागृती व्हावी या एकमेव उद्देशाने सावर्डे येथील प्रतिष्ठित उद्योजक संजय पाकळे,सचिन पाकळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालकलाकार कु. सारा संजय पाकळे हिची प्रमुख भूमिका असलेल्या द व्हाईट एस्कॅसी लघु चित्रपटाचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला.
या शॉर्ट फिल्ममध्ये सावर्डेतील उद्योजक संजय पाकळे यांची कन्या सारा पाकळे हिची प्रमुख भूमिका आहे. एक सामाजिक संदेश देण्यासाठी आणि समाजामध्ये हा संदेश पोहोचविण्यासाठी पाकळे बंधूनी या फिल्मसाठी पुढाकार घेतला
आहे.या फिल्ममध्ये एक जन्मदाती आई रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक निधन पावते आणि नवजात अर्भक पोरके होते. यावेळी तिची मोठी बहीण अर्थात सारा पाकळे ही या चिमुकल्याला घेऊन संघर्ष करते. बाळ जगावे म्हणून दुधासाठी वणवण फिरते. अनेक ठिकाणी बाळाच्या आरोग्यासाठी दूध मिळावे म्हणून प्रयत्न करते. मात्र, तिला अनेकवेळा अपयश
येते. याचवेळी एक सामाजिक कार्यकर्त्याची गाठ पडते. यावेळी तो त्या चिमुकल्या मुलाला
घेऊन ‘हिरकणी’ कक्षात जातो आणि त्या ठिकाणी स्तनदा माता त्या चिमुकलीला दूध पाजते
आणि या चिमुकल्याचा जीव वाचतो असे कथानक या शॉर्ट फिल्ममध्ये दाखविण्यात आले
आहे. चिमुकली म्हणून या फिल्ममध्ये अवघ्या तीन महिन्याची श्लेषा पाकळे ही आहे तर तिची मोठी बहीण म्हणून सारा हिने भूमिका बजावली आहे. अलिकडे अनेक नवजात अर्भके देवाला सोडून दिली
जातात. अशा मुलांचे पोषण होत नाही. मातेचे दूध न मिळाल्याने अनेक नवजातांचा
जीव जातो. या पार्श्वभूमीवर शासनाने ‘हिरकणी’ योजना सुरू केली आहे. मात्र, ही योजना
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली नाही. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून हा संदेश
देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाश्चिमात्त्य देशात अशाप्रकारच्या अनेक संस्था असे
काम करीत आहेत. काही ठिकाणी या दुधाची बँकदेखील आहे. मुलांच्या पोषणासाठी मातेचे दूध मिळणे अत्यंत गरजेचे असते. ते दानदेखील केले जाते, असा संदेश या फिल्ममधून देण्यात आला आहे. संजय व सचिन पाकळे हे या शॉर्ट फिल्मचे निर्माते असून प्रमुख भूमिका सारा
हिने वठवली आहे. या शिवाय अमृता पाकळे, संजना जाधव, रसिका जोशी, सूरज बिजतकर,
प्रशांत सावंत, विनायक सावर्डेकर, संजीवनी जाधव, समीर विजयन यांनी भूमिका केल्या आहेत. दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले आहे. शॉर्ट फिल्म स्पर्धेत तसेच विविध ठिकाणच्या प्रदर्शनात ही फिल्म दाखवली जाणार आहे, असे उपस्थितांनी सांगितले. या प्रदर्शनाच्यावेळी आ.शेखर निकम,पिंट्याशेठ पाकळे,बांधकाम व्यावसायिक साजन कुरुसिंगल,देवराज गराटे, गणेश मोडक,पराग जाधव अनिरुद्ध निकम, स्मिता पाकळे, पूनम पाकळे व पाकळे
परिवारातील सदस्य उपस्थित होते. सावर्डे परिसरातच या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण करण्यात
आले आहे. महाराष्ट्र राज्यात हिरकणी कक्षाचे महत्व वाढावे लोकांच्यात यांची जनजागृती व्हावी या दृष्टींनी पाकळे बंधूनी सुंदर लघु चित्रपटाची निर्मिती केली आहे भविष्यात हा चित्रपट शासनाच्या आरोग्य विभागामार्फत *पone* लोकांपर्यंत संदेश पोहचविण्याचे उत्कृष्ट करू शकेल या करिता मी स्वतः राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याशी बोलून त्यांना हा चित्रपट दाखवणार असल्याचे आ.शेखर निकम यांनी सांगितले.

फोटो : द व्हाईट एस्कॅसी लघु चित्रपटाचा शुभारंभ करतांना आ.शेखर निकम,पिंट्याशेठ पाकळे, गणेश मोडक, सारा पाकळे, साजन कुरुसिंगल छायाचित्रात दिसत आहेत(छाया: ओंकार रेळेकर)

*दखल न्यूज भारत.*