जयसाई क्रिडा मंडळाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील,रायगड चौकात जयसाई मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम सामाजिक भान राखत सुरक्षित अंतर ठेवत आयोजित केला होता.
यावेळी कार्यक्रमास मनपा गटनेत्या राखी जाधव,चित्रपट सेनेचे चिटणीस भूषण चव्हाण,पत्रकार सचिन भांगे,युवासेनेचे आदेश दरेकर,रवि जाधव आदी प्रमूख पाहुण्यांसह
मंडळाचे संतोष कदम,विराज ठुकरुल,यशवंत करंजे,विकास बने,प्रविण गोळे,प्रसाद ठुकरुल आदी सर्व उपस्थित होते.

यावेळी राखीदिदी जाधव,भुषण चव्हाण,यानी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.