शिवसेना शाखा १२९ च्या वतीने ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : दि.१५ – शिवसेना शाखा क्रमांक १२९ च्या वतीने कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.देशावर कोरोनाचे संकट ओढवल असल्यामुळे या वेळेस अगदी साधेपणाने स्वतंत्र दिन शिवसेना शाखा क्रमांक १२९ जांभळीपाडा घाटकोपर येथे साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाखाप्रमुख शिवाजी ( मामा ) कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रगीताचे गायन करून झेंड्याला सलामी देण्यात आली. “स्वतंत्र दिनाचा विजय असो” “स्वतंत्र दिनाचा विजय असो” वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अश्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना शाखा क्र १२९ कार्यालयप्रमुख महादेव (अप्पा)कानसकर,श्री. लवू पार्सेकर, युवासेना शाखाअधिकारी सतिश शंकर कोकाटे, उपशाखाप्रमुख अशोक शिरगावकर, शमशुद्दीन मोमीन भाई,गटप्रमुख भगवान गवळी, भास्कर जाधव, रवींद्र धोत्रे ,उपशाखा अधिकारी शैलेश कहार, शिवसैनिक हेमंत मोरजकर(छोटू भाई),विजय बाबर,मधुकर गायकवाड,दत्ता दळवी,जयश्री भोसले ताई उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासीयांना शिवसेना शाखा १२९ तर्फे खूप खूप शुभेच्छा