विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सतिश सांगळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत असताना  प्राचार्य अर्चना वीरकर सह   सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते

137

 

इंदापूर तालुका, प्रतिनिधी दि. १५  बाळासाहेब सुतार,

बिरंगाई शिक्षण प्रसारक संस्था संचलित हरणेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला कोरोना पार्श्वभुमीवर अटी व नियमांचे पालन करून ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतिश सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्या अर्चना वीरकर ,शिक्षक स्वप्नील शिंदे उपस्थित होते

ध्वजारोहणाचा  कार्यक्रम सकाळी ८:२५ मिनिटांनी करण्यात आला राष्ट्रध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले

कोरोना ची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्यदिनाचा  कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून सर्व नियमांचे पालन करण्यात आले तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शालेय स्तरावर ऑनलाइन पद्धतीद्वारे  निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160