बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम केला जातो. याप्रमाणेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 127 चे वॉर्ड अध्यक्ष गणेश वसंत भगत यांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी भटवाडी खंडोबा टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम आज ( दि 14 ) रोजी शुक्रवारी सकाळी 11 वा. करण्यात आला. खंडोबा टेकडीवर निसर्ग सौंदर्य फुलत असल्याने या परिसरात पर्यावरण संरक्षण करण्याच्या उद्देशाने भाजपचे गणेश भगत यांनी खासदार मनोज कोटक आणि आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण केले. यावेळी विविध जातीची झाड लावण्यात आली . याप्रसंगी गणेश भगत यांच्यासह विनोद जाधव , संतोष शिंदे, सतीश लोखंडे, सागर खरात, रमेश शिंदे, राजेश आहिरे , नवनाथ स्वामी आदीसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.