कन्हान येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विकासमंच च्या वतिने थाटात साजरी कन्हान शहर विकास मंच द्वारे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा

 

कन्हान – कन्हान येथे विविध संघटने द्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले असुन
शहर विकास मंच द्वारे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .
बुधवार दिनांक १२ जानेवारी ला राजमाता जिजाऊ , युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त जयंती थाटात साजरी करण्यात आली
*कन्हान शहर विकास मंच* द्वारे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाचे
आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोर असलेल्या ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे , प्रमुख अतिथि जेष्ठ पत्रकार कमल यादव , मराठा सेवा संघ कन्हान चे जेष्ठ कार्यकर्ता, प्रबोधनवादी चळवळीचे पुरसकर्ते, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते सर , मंच मार्गदर्शक भरत सावळे , व परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा चे मार्गदर्शक वस्ताद वखलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद , यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा च्या विद्यार्थांना व विद्यार्थींनींना त्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल मान्यवरांचा हस्ते त्यांना बुक , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान ग्रामीण पत्रकार संघा चे सचिव सुनिल सरोदे , जेष्ठ नागरिक प्रभारकर रुंघे , गौरव भोयर , केतन भिवगडे , अरविंद नाईक , प्रवीण हुड सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांनी केले तर आभार रुषभ बावनकर यांनी मानले .