अवकाळी पावसा व गारपीटमुळे शेतकर्‍यांचे नुकसान बदल नायब तहसीलदार आडे साहेब यानां प्रहार जनशाक्ति संगठन व्दारे निवेदन देण्यात आले

 

 

पारशिवनी :-तालुक्यातील अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे करीता आज दि १२/०१/२०२२ ला पारशिवनी नायब तहसीलदार आडे साहेब यानां निवेदन देण्यात आले कापुस तुर चना गहु फळबाग व भाजीपाला या सारख्या पिकांचे तात्काळ शेतीचे व घराचे पंचनामे करण्यात यावे व शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल यावेळी उपस्थित तालुका उपाध्यक्ष राधेश्याम नखाते विद्यार्थी तालुका प्रमुख अभिषेक एकुणकर शांतारामजी ढोंगे सुरज शेन्डे भिम चौरीवार दिलीप बगमारे प्रकाश खरकाटे विजय मडामे भारत लांजेवार निरंजन बिजेवार.सह शेतकरी हजर होते.