Home Breaking News कोठी हल्ल्यात शहीद पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ...

कोठी हल्ल्यात शहीद पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत मानवंदना

198

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली,(जिमाका)दि.15: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर व पोलीस दलातर्फे शहीद पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना दि.15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वा. 40 मी.नी पोलीस कवायत मैदानावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार शहीद पोलीस जवान दुशांत नंदेश्वर यांना भावपूर्ण मानवंदना दिली. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अति पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, अजयकुमार बन्सल यांनी या घटनेत मृत पावलेल्या शहीद दुशांत नंदेश्वर यांच्या पार्थीवावर पुष्पचक्र अर्पण केले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहिद जवान नंदेश्वर यांचे परिवार उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले.

Previous articleसिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके व वस्तुंचे वाटप.
Next articleदुर्लक्षित विषयांना प्रथम प्राधान्य – राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न