सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके व वस्तुंचे वाटप.

119

अशोक खंडारे उपसंपादक
भामरागड तालुक्यातील आरेवाडा व कुमरगुडा गावांतील विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सोय व्हावी या उदात्त हेतूने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ व्या बटालियनतर्फे पुस्तके व इतर साहित्य यांचे वितरण करण्यात आले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ व्या बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या आदेशानुसार १४ आॅगष्ट २०२० ला सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत शालेय ग्रंथालयासाठी पुस्तके,कपाट,टेबल, खुर्ची इत्यादी साहित्यांचे वाटप तालुक्यातील आरेवाडा व कुमरगुडा गावांतील विद्यार्थ्यांना करण्यात आले.याप्रसंगी केंद्रीय राखीव पोलीस दल एफ/३७ चे निरीक्षक प्रविंद्र प्रसाद, भामरागड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल,भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्र्विनी सोनवणे, भामरागडच्या नगराध्यक्षा संगिता गाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सदर पुस्तकांमुळे वाचनाची गोडी निर्माण होईल व अभ्यासाची चांगली सवय लागेल असे विचार यावेळी अश्र्विनी सोनवणे ह्यांनी व्यक्त केले.