आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी विद्यार्थ्यांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन सायले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साह्याने करण्यात आले होते. या दोन दिवशीय लसीकरण मोहीमे अंतर्गत ६३० विद्यार्थ्यांनी लस घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला. सदर लसीकरण मोहीमेच्या शुभारंभी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, उपाध्यक्ष कुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागांतर्गत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेसाठी सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. स्वप्नील धने, डॉ. स्वप्नाली शिर्के, डॉ. प्रियांका थेराडे यांच्यासह परिचारिका भावना दळवी, भारती पाटोळे, प्रियंका इंगळे, चंद्रकला खेडकर, विजयश्री वाघाटे, सहाय्यक सचिन धामणकर, श्रीनिवास पेडणेकर, आशा सेविका ऐश्वर्या पाष्टे, सुप्रिया महाडिक यांनी मेहनत घेतली. या लसीकरण मोहिमेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी करून हा उपक्रम यशस्वी केला. या लसीकरण मोहिमेबाबत बोलताना प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले की, महाविद्यालयातील १००% विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे आमचे उद्दिष्ट असून या मोहिमेअंतर्गत सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारीवर्ग यांनी दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. या अभियानासाठी सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई यांनी करून शुभेच्छा दिल्या.

*फोटो-* लसीकरण मोहिमेच्या शुभारंभी संस्थाध्यक्ष भागवत, उपाध्यक्ष भोसले, प्राचार्य डॉ. तेंडोलकर आणि उपस्थित वैद्यकीय कर्मचारी.
*छाया-* प्रा. धनंजय दळवी.

दखल न्यूज भारत