स्वातंत्र्य सेनानी,महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर मारोतराव (दादासाहेब) कन्नमवार यांची १२२ वी जयंती उत्साहात साजरी.

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा

वणी – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बहुजन नायक, विदर्भ पुत्र स्व.मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांची जयंती १० जानेवारी २०२२ (सोमवार) रोजी सकाळी ९:३० वाजता कन्नमवार चौक, वणी येथे साजरी करण्यात आली.

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, प्रमुख पाहुणे माजी आमदार वामनराव कासावार, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक राकेश बुग्गेवार, समाजाचे जेष्ठ समाजसेवक गजानन गट्टेवार होते. संचालन राकेश बरशेट्टीवार यांनी केले. प्रस्तावना गजानन चंदावार यांनी केली.कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या विषयी माहिती सविस्तर माहिती देऊन लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री यांची शासकीय स्तरावर जयंती व्हावी यासाठी मागील २०१३ पासून शासनाकडे बेलदार समाज, विविध भटके विमुक्त संघटना पत्रव्यवहार करत आहे, तरी २०२१ रोजी थोर महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात ३१ डिसेंबर २०२१ रोजी सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्र जारी करण्यात आले असता या शासन परिपत्रात याही वेळी महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी लोकनेते कर्मवीर मारोतराव सांबशिवपंत (दादासाहेब) कन्नमवार यांची शासकीय जयंतीकरिता महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून पत्र पाठवले तसेच लोकप्रतिनिधी मार्फत पत्रव्यवहार ही केला, तरीही याही सरकार कर्मवीर स्वातंत्र्य सेनानी यांचा विसर पडला, यापुढे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार समिती महाराष्ट्र तर्फे शासकीय जयंतीसाठी राज्यभर आंदोलन उभारणार असे सांगितले, बेलदार समाज बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार यांनी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा प्रचार व प्रसार विविध पद्धतीने महाराष्ट्र भर करू असे म्हणाले. आभार विशाल बोरकूटवार यांनी केले.

या कार्यक्रमात ज्ञानेश्वर बोनगिरवार, विठ्ठल पडलवार विनोद महाजनवार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, महिला कार्यकारीणी अध्यक्ष अल्काताई दुधेवार, शहर कार्यकारिणी अध्यक्ष संदीप मुत्यलवार, ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे समन्वयक प्रवीण खानझोडे, अनिल ठाकूरवार, भैय्याजी बदखल, काँग्रेस सेवादलचे भाऊराव गेडाम, प्रवीण येलपूलवार, राजू बोईनपेल्लीवार, विलास चिट्टलवार, अमोल बुग्गेवार, राजूभाऊ धावंजेवार, अनिकेत कुचेवार, काँग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे, अविनाश पोचमपेल्लीवार, सुनील मुत्यलवार, सुरेश चिट्टलवार, दिगांबर पालमवार, काजल पुरमशेट्टीवार, रसिकाताई बेझलवार, वैशाली मारगमवार, सुवर्णाताई बेझलवार, प्रितीताई आकुलवार तसेच बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी, युवा बेलदार शहर कार्यकारिणी, वणी, बेलदार समाज महिला कार्यकारिणी वणीचे सर्व पदाधिकारी तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.