नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे आ.कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते उद्घाटन

0
320

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

गांधीनगर- देसाईगंज तालुक्यातील मौजा गांधीनगर येथे आज नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आ.कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यापूर्वी गांधीनगर येथे ग्रामपंचायत कार्यालय नसल्याने गांधीनगर येथील नागरिकांना लागणाऱ्या दाखले,कागदपत्रांसाठी दोन किमी अंतरावर जावे लागत असे परंतु आ कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाने गांधीनगर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय मिळाल्याने गांधीनगर वाशी आनंद व्यक्त करत आहेत.
तेव्हा कार्यक्रमाला सौ.रेवताताई अलोने सभापती प स देसाईगंज, रोशनी ताई पारधी बालकल्याण विकास सभापती जिल्हा परिषद गडचिरोली,शेवंताबाई अवसरे उपसभापती पंचायत समिती देसाईगंज, मा.नानाभाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली मा. सलाम साहेब संवर्ग विकास अधिकारी पंचायत समितीदेसाईगंज श्री मोहन पाटील गायकवाड माजी सभापती पंचायत समिती देसाईगंज श्री गोपाल जी उईके माजी उपसभापती पंचायत समिती देसाईगंज,मा,चिलबुले साहेब प्रशासकीय अधिकारी देसाईगंज राजूभाऊ जी जेठाणी भा ज पा तालुकाध्यक्ष देसाईगंज,अर्चनाताई ढोरे पंचायत समिती सदस्य देसाईगंज तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत आज नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.