लवारी ते गडकुंडली ला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन

 

संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
आज दि.10जानेवारी मौजा लवारी येथे लवारी ते गडकुंडली पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.नाना भाऊ पटोले आमदार प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, प्रमुख पाहुणे मा.अशोक कापगते माजी जि.प.सदस्य, लालचंद लोथे माजी प.स.सदस्य, नरेश नगरीकर माजी उपसभापती, अनिल किरणापुरे माजी उपसरपंच, सुरेश नगरीकर उपसरपंच, गजानन किरणापुरे,राम महाजन, भास्कर कापगते,विद्या कापगते,वैशाली कापगते ,रमाताई जनबंधू ,रेखा कटंकार ,मंजुळाबाई वळमक्रम व समस्त ग्रामवासी जनता यांच्या उपस्थितीत पार पडला.
ग्रामपंचायत लवारी व गावकऱ्यांच्या वतीने विविध कामांचे निवेदन देण्यात आले,
नाना भाऊ पटोले यांनी बोलतांनी सांगितले की,
साकोली तालुक्यातील लवारी हा गाव भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे,लवारी ला कुषी विद्यापीठ आणण्याची तयारी आहे, काही अपूर्व राहिलेले काम पूर्ण होतील, असे ते बोले. सूत्रसंचालन खेमराज टेंभुर्णे,प्रास्ताविक अशोक कापगते, आभार अनिल किरणापुरे यांनी केले.