भक्षाचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबटयाला दिले जीवनदान

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

पाली : भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.ही घटना रविवारी संध्याकाळी साठरे बाम्बर, पाली येथे घडली.
ग्रामस्थ रामचंद्र यशवंत धनावड़े यांच्या विहिरीत बिबटया पडला होता.
याबाबतची माहिती दूरध्वनीवरुन मिळाल्यावर वन विभागाचे श्री.क्लेमेंट बेन मुख्य वन संरक्षक कोल्हापुर,श्री.दीपक खाड़े विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण),श्री.सचिन निलख सहाय्यक वन सरंक्षक (प्रादेशिक) रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.गौतम कांबळे वनपाल पाली, श्री.तौफीक मुल्ला वनपाल संगमेश्वर,श्री.दिलीप आरेकर वनपाल लांजा,श्रीम.मिताली कुबल वनरक्षक जाकादेवी,श्री.न्हानु गावड़े वनरक्षक साखरपा,श्री.विक्रम कुंभार वनरक्षक लांजा आणि श्री.अनिकेत मोरे यानी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने बिबटयाला विहिरबाहेर काढत पिंजर्‍यात जेरबंद केले.एक तास अथक प्रयत्नानंतर बिबटयाला जेरबंद करण्यात आले.अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचा नर जातीचा बिबटया असून लांबी १७७ सेंमी आणि ऊंची ९२ सेंमी होती.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर बिबटयाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती वन विभागकडून देण्यात आली.

*दखल न्यूज भारत.*