पूर्णा नदीपात्रातून रात्री अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खल्लार पोलिसांनी पकडला, अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर चालक पळाला

युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील पूर्णा नदीच्या पात्रातून रात्रीच्या सुमारास विना परवाना वाळूची अवैध वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खल्लार पोलिसांनी काल पहाटेच्या सुमारास पकडला असुन वाळूची वाहतुक करणारा ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला
खल्लार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडुरा येथील पूर्णा नदीच्या पात्रातून विना परवाना वाळूची अवैध वाहतुक रात्रीच्या सुमारास केल्या जात असल्याची माहिती खल्लार पोलिसांना मिळाली त्यानुसार ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार अनंत हिवराळे, विनोद ढगे, यांना विना परवाना वाळूची अवैध वाहतुक करणारा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह वडुरा गावाकडून वडुरा पुनवर्सनकडे येत असताना दिसला पोलिसांनी केलेली नाकाबंदी चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह त्याच जागेवर सोडून दिला व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला पळून गेला
पोलिसांनी सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीची पाहणी केली असता नंबर प्लेट व ट्रॅक्टर मालकाचे नाव खोडले असल्याचे निदर्शनास आले ट्रॉलीत एक ब्रास वाळू असल्याचे आढळून आले
पोलिसांनी जागेवर पंचासमक्ष पंचनामा करुन 4 लाख 45हजार रुपये किंमत असलेला ट्रॅक्टर, ट्रॉली व 4 हजार रुपयांची वाळु असा एकुण 4 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन पो स्टे ला जमा केला याप्रकरणी गौण खनिज चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे