नाचोना येथील अवैध देशी दारु विक्रेत्यास पकडले

युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम नाचोना येथील अवैध देशी दारु विक्रेत्याच्या घरावर खल्लारचे ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशनचे स पो उपनिरीक्षक राजु विधळे यांनी काल दि 9 जानेवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास धाड घालुन नाचोना येथील निलेश विश्वनाथ सदाशिव वय 33 वर्ष याच्या घरावर धाड घालुन त्याच्या घरातून 840 रुपये किमतीच्या 12 अवैध देशी दारुच्या पावट्या जप्त केल्या असुन आरोपीविरुध्द मुदाका 65 (इ)नुसार गुन्हा दाखल करुन तपासात घेतला