शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या दारी शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुडम शाळेचे अनलॅक लर्निंग उपक्रम

 

ग्रामीण प्रतिनिधी गुड्डीगुडम / रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम: अहेरी आदिवासी विकास विभाग प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्य.आश्रम शाळा गुड्डीगुडम च्या वतीने अनलॅक लर्निंग उपक्रमा अंतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून टोले, वस्त्या, पाडे, गावापर्यंत पोहचायला रस्त्याची सुविधा नाही तरी त्या परिस्थितीत डोंगर, नाले, दऱ्या ओलांडून सदर शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी पोहचून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य मोठया आनंदाने करीत आहेत.
दामरांचा, मांडरा, रुमलकसा,भंगारामपेटा, झिमेला, नैनगुंडम,निमलगुडम, तोडका इत्यादी १६ गावे, पाड्या, वस्त्या, टोल्यापर्यंत आश्रम शाळा गुड्डीगुडम चे शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन शिक्षण प्रवाहाचा ओघ अखंड ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत.
अनलॅक लर्निंग उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात एक साधनव्यक्ती नेमून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचा दररोज अभ्यास करवुन घेतला जातो तसेच प्रत्येक गावात एक समनव्य समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षणाचं ओघ नियमित अखंड सुरू ठेवण्यास मदत होईल.