स्वतंत्र भारतातील पहिली घटना कोविड ने स्वतंत्र दिन साजरा करण्यास घातली बंधने

159

 

बिंबिसार शहारे/अतित डोंगरे

गोंदिया : भारत देश १५ आगष्ट १९४७ ला ब्रिटिश गुलामगिरीतून आझाद झाला. १५ आगष्ट हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची परंपरा भारतात सुरू झाली. ढोल तासांच्या गजरात प्रभात फेऱ्या, मिरवणुका, आंदोउल्हात लाऊडस्पीकरच्या आवाजात सांस्कृतिक कार्यक्रम, माईकच्या सहवासात संवाद, परिसंवाद, वक्तृत्व स्पर्धा इ. कार्यक्रमास मोठया उत्साहाने साजरा करण्यात येत होता.
मात्र २०२० हे वर्ष असे उजाडले की देशात आपला राष्ट्रीय सण-उत्सव साजरा करण्यास देशाला कोविड-१९ या विषाणूने निर्बंध घातले.
कोविड विषाणूची बाधा सर्व भारतभर झाली. त्याला नियंत्रीत करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे सर्व भारतीयांसाठी बंधनकारक झाले.
कोविड विषाणूने भारत देशातील कुटुंबची कुटुंब आपल्या विळख्यात घेतली. काही कुटुंबाचे वारस हिरावून घेऊन अख्खे कुटुंब कोविडने फस्त केले.
असे असतांना सावध पवित्रा घेत, आहे त्याच ठिकाणी राहून, स्वातंत्र्याचा उत्सव पार पाडण्यात आला. गाव तेथे ध्वजारोहण तेही पाच लोकांत साजरे करण्यात आले.
निर्बंध असले तरी देशातुन कोविड विषाणूची बाधा निघून जावी यासाठी प्रार्थना देखील करण्यात आलेली आहे. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्याविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पहिल्यांदा पार पडला आहे.
भारत कृषी प्रधान देश असून मोठ्या थाटामाटात शेतकरी बांधव पोळा सण साजरा करतात. बैलास सजवून गावाच्या आखरावर आंब्याच्या पानाच्या पताका लावून बैलांचा नवरदेवासारखे सजवून मिरवणुकीत नेतात. दुस-या दिवस मारबत म्हणून साजरा करतात. काही ठिकाणी जत्रा, जलसा,मिरवणुका, धार्मिक परंपरा जपल्या जातात. यावर देखील कोविड विषाणूने लगाम घालण्यास शासन-प्रशासनास बंधने घालण्यास लावले आहे. या पुढे गणेश उत्सव, शारदा-दुर्गा उत्सव घरातच अगदी साधेपणे सामाजिक अंतर राखून, नियमांचे पालन करूनच राष्ट्रीय सण उत्सव पार पाडले जाणार आहे.