Home गोंदिया शेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात...

शेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात भर्ती महिलेचे बायन,जबाब नोंद करण्यास पोलिसांचा कर्तव्यकुचराई

133

 

तिरोडा प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : बालूबाई बिसेन बिसेन या उपजिल्हा रुग्णालयात भर्ती असून देखील त्यांचा पोलिसांनी बायन नोंद न करता कोणतीही कार्यवाही केली नाही. याची तक्रार देण्यास पुरणलाल बिसेन गेले असता त्यांना पोलिसांनी माघारी पाठविले. तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर कोणा बड्या लोकांचे दबाव असल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत पुरणलाल बिसेनने केला.
बालुबाई बिसेन ६ आगष्ट रोजी आपले शेताची पाहणी करण्यासाठी पुतण्यासह दुपारी गेल्या होत्या. तेव्हां योगेश बिसेन,प्रकाश गोबाडे,मुकेश गोबाडे हे शेत पिकाची नासधूस करीत असतांना आढळले. त्यावर त्यांना हटकले असता या तिन्ही इसमांनी मारपीट केले. पुतण्या मध्यस्थीकरीता गेला असता त्याला मारण्याची धमकी दिली. बालुबाई दुखापत झाल्याने त्या पोलिसात तक्रार देण्यास गेल्या असता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. तिने ३ दिवस उपचार घेतले. याची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचे समजल्यावरून पती पोलीस स्टेशन तिरोडा येथे तकार देण्यास गेले असता त्यांना देखील माघारी पाठविले.
आपणास न्याय मिळावा, आपल्यावरील अन्यायास वाचा फुटावी यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपबिती व्यक्त केली.
आपल्या पत्नीस गैरर्जदारांनी मारपीट केली. पुतण्यास देखील ढकल ढुकल करून मारहाण केली, पुढे पाहून घेण्याची धमकी दिली. पुतण्याचे तक्रारीवरून निव्वळ अदखलपात्र पात्र गुन्ह्याची नोंद करून कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला.
महिलेला व मुलास पकडून मारहाण करणे, शिवीगाळ करणे, दोघांना जीवे मारण्याची धमकी देणे हे गँभीर बाब असून देखील गुन्हा दाखल न होणे, महिलेची बायन न घेणे यास केवळ कोणाचे तरी दडपण हे कारण असल्याचे व्यक्त केले. शेतीच्या वादातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेतली जावी. असा टाहो पत्रकार परिषदेत पुरणलाल बिसेन, यशवंत बिसेन, सचिन बिसेन फोडला आहे. यापुढे वरिष्ठाना तक्रार देण्याचे यावेळी बोलून दाखविले. आता पोलीस प्राशन कोणती भूमिका घेतात. याकडे लक्ष लागले आहे.

Previous articleएस.डी.एम.सोनुले ताई यांच्या हस्ते अर्जूनी मोरगाव तहसील कार्यालयाच तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा
Next articleस्वतंत्र भारतातील पहिली घटना कोविड ने स्वतंत्र दिन साजरा करण्यास घातली बंधने