वडुरा येथुन अवैध देशी विक्रेत्यावर खल्लार पोलिसांची धाड

युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार पो स्टे हद्दीतील ग्राम वडुरा येथील कैलास रामदास नांदने वय 43 वर्ष हा गावात अवैध देशी दारु विकत असल्याची गुप्त माहिती खल्लार पोलिसांना मिळाली त्या माहितीनुसार ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार रामरतन चव्हान यांनी सहकारी कर्मचारी यांच्यासोबत त्याच्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरून 630 रुपयांच्या अवैध देशी दारूच्या पावट्या आढळून आल्यात पोलिसांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपीविरुध्द मुदाका 65 (इ)नुसार गुन्हा दाखल केला आहे