जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे स्वातंत्र्यदिन साजरा शा.समिती अध्यक्ष श्री नागेश शिरलावर यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
85

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे कोविड -19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन डिस्टसिंग चे नियमाचे पालन करून आणि उपस्थित नागरिक सेनीटायजर चा वापर करून स्वातंत्र्यदिनाच्या पर्शवभूमीवर 73 वा स्वातंत्रदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री नागेश शिरलावर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.एम.कोंडागुर्ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष श्री.सुरेश बामनकर,सदस्य राकेश सोयाम, अंगणवाडी सेविका सौ.कमलाबाई बामनकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मेश्राम, सहाय्यक शिक्षिका कु.एन.एम.पातावार, मोरेश्वर बामनकर, राकेश बामनकर व गावातील नागरिक उपस्थित होते.