धक्कादायक ६५वर्षीय आज्याने केला ७० वर्षीय आज्जीवर अत्याचार

 

हर्ष साखरे उपसंपादक

अमरावतीः जिल्ह्यात दिवसेंदिवस अपराधाच्या घटना वाढत आहेत.अशातच नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.विनयभंगाच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातुन पोलीस मुख्यालयात येत असताना एक संतापजनक घटना समोर आली आहे.या घटनेमुळं परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज असताना अमरावती जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.नववर्षाच्या सुरुवातीलाच ७० वर्षीय आजी वर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलिसांनी या नराधम आजोबाला बेड्या ठोकल्या आहे.या गुन्ह्याची चर्चा परिसरात रंगु लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात आजी किराणा सामान आणण्यासाठी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडल्या होत्या.दरम्यान ६५ वर्षीय आरोपी साहेबराव इंगळे त्यांना रस्त्यात भेटले.त्यावेळी आजींनी एकट पाहुन त्यांनी मी तुम्हाला घरी सोडतो,असं सांगितलं.घरापर्यंत सोडण्याच्या बहाण्याने नराधमाने ७० वर्षीय आजीवर अत्याचार केला.याबाबत अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवुन आरोपीला अटक केली आहे.सध्या आरोपीला तुरुंगात रवाना करण्यात आलेलं आहे.