कामथे रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या

191

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

चिपळूण : कामथे रुग्णालयातच एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने काल रात्री साडेबाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ६ ऑगस्ट रोजी या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण खेड तालुक्यातील आंबडस गाव येथील आहे. रात्री हॉस्पिटलच्या बेडवरील चादरीने लोखंडी गजाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयाचे डॉ. मारुती म्हात्रे यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली आहे. कोविड च्या भीतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे नेमकं कारण अस्पष्ट.कोरोना रुग्णाच्या आत्महत्येनंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

दखल न्यूज भारत