चिमूर तालुकातंर्गत,मौजा कोटगाव मध्ये ऐन पावसाळ्यात,पाणी पेटले…. — गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट व धावपळ… — पाइपलाइन व पाण्याच्या टाकी अंतर्गत इतर लाखो रुपयांची कामे बोगस!

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक

आज भारत देशासह संपूर्ण जगात भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे,देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७४ वर्ष पूर्ण झाले..देशाची वाटचाल विकासाकडे होत असताना,याच देशातील अनेक गावे,खेडे(ग्रामीण भाग)विकासा पासून कोसो दूर असल्याचे चित्र,कोटगाव नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या उग्र समस्या वरुन लक्षात येते आहे.

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे
ऐन पावसाळा ऋतू मध्ये कोटगाव येथील जनतेला पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

लाखो रुपयांचा वारंवार निधी खर्च करून,कोटगाव येथील नळ योजनांची कामे दुरस्त केली जातात.परंतू सदर कामे ही चुकीच्या पध्दतीने व अयोग्य रित्या दुरुस्ती केली जात असल्यामुळे याचा फटका कोटगाव येथील नागरिकांना बसतो आहे.
जलस्वराज अंतर्गत येणाऱ्या नळ योजनेचा (मागील कित्येक वर्षे बंद असणाऱ्या) दोन महिन्या पूर्वी प्रारंभ करण्यात आला.परंतु या दोन महिन्यांच्या कालावधी मध्ये ही नळ योजना पूर्ण फसवी ठरली आहे,या दोन महिन्यांच्या कालावधी मध्ये पंधरा वेळा ही योजना ठप्प पडली आहे.मागील चार दिवसांपासून नळाला पाणी येत नसून गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे,गावाच्या चहू बाजूनी असणारे नाले,गावात असणारे हातपंप, विहिरी तरी पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना करावी लागणारी वणवण ही या गावाला जनप्रतिनिधींनी दिलेली लौकिक भेट समजायची काय?हा यक्ष प्रश्न कोटगाववासियांना पडला आहे..
ज्या ठेकेदाराला हे काम दिले गेले त्याने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे,असा आरोप गावकरी करत आहेत.
नळ योजना सुरू झाल्या नंतर ग्रामपंचायत ने गावातील विहिरी,हातपंप याकडे दुर्लक्ष केले,मागील एक महिपासून विहिरीमध्ये साधे ब्लिचिंग पावडर सुद्धा टाकण्यात आले नाही.
आज देशाचा स्वतंत्र दिवस असून सर्वत उत्सव आहे…परंतु कोटगाव येथील जनता पाणी शोधत आहे….येत्या काळात या गावात पाणी पेटणार हे मात्र नक्की..