श्री. वैभव विष्णू शिंदे पोलीस पाटिल कुर्धे यांचा कोव्हील्ड योद्धा म्हणून सन्मान

138

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यात कोव्हील्ड 19 सारख्या संकटात श्री वैभव विष्णू शिंदे यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.
श्री वैभव विष्णू शिंदे कुर्धे पोलीस पाटील यांनी गावात उत्तम पणे कामगिरी केली आहे. कोरोना सारखा संकटात त्यांनी ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे समन्वय साधत काम केले आहे. अनेकांना मदतीचा हात दिला आहे. जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी अनेकांना त्यांनी तेथील कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून मदत पोचवली आहे या संकटात ते आपल्या जीवाची किंवा कुटुंबाची परवा न करता सामाजिक बांधिलकीचे भान राखत त्यांनी अनेकांना मदत केली आहे याची दखल घेत पूर्णगड सागरी पोलीस ठाणे येथे कोरोना योद्धा म्हणून रत्नागिरीचे डी.वाय.एस्.पी. गणेश इंगळे, पूर्णगड पोलिस निरीक्षकश्री. सुरेश गावित सर, श्री कांबळी सर यांच्या उपस्थिती प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.

दखल न्यूज भारत