जिल्हा शासकीय रुग्णालय सह ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्तपदे तत्काळ भरण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचाच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक उपोषण

231

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात विविध सवर्गाची पदे रिक्त आहेत.अनेकदा मागणी करुनही ही पदे भरलेली नाही.
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे मागील अनेक वर्षात न भरल्याने आरोग्य व्यवस्था ‘चिंताजनक’ झाली आहे. ही रिक्तपदे तत्काळ भरावीत म्हणून महाराष्ट्र समविचारी मंचच्या विद्यमाने आज १५ अॉगष्ट स्वातंत्र्यदिनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय,ग्रामीण रुग्णालये,सह सर्व आरोग्य विभागात विविध विषयांच्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तंत्रज्ञ, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार यांची अनेक रिक्त पदे मागील सुमारे पंधरा वर्षात भरलेली नाहीत. लोकप्रतिनिधी आश्वासने देतात. कृती शुन्य होते. सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या भरमसाट वाढली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने उपलब्ध कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे आहेत त्या कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. त्यातच कोरोना महामारीने अनेक कर्मचाऱ्यांना ग्रासल्याने मुळातच कमी संख्या असलेल्या आरोग्य कर्मचारी संख्येमुळे आरोग्य व्यवस्था विषयक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाने आरोग्य कर्मचारी भरती जाहीर केली पण नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा शाश्वती न दिल्याने या भरतीला , थंड प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाची ‘गंभीर’ परिस्थिती लक्षात न घेता श्रेयापोटी नवीन महिला रुग्णालयात नवीन कोव्हिड सुरु करण्यात आले आहे.
कोरोना अनुमान तपासणी केंद्रात लागणारे तज्ञ कमी आहेत. परिणामी या सर्व परिस्थितीचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. या सर्व आरोग्य व्यवस्थेच्या ‘चिंताजनक’ परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनासह अन्य सबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी आज १५ अॉगष्ट्र रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या तुटपुंजा कर्मचारी बळावर या रुग्णालयांचा रेटा चालविला जात आहे.तरी सर्व रुग्णालयातील रिक्तपदांचा आढावा घेण्यात यावा. सर्वप्रथम नव्याने नेमणा-या कर्मचाऱ्यांची थेट सरळ सेवा भरती करा. नोकरीची शाश्वती मिळाल्यास कर्मचारी भरतीला चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. याविषयी लवकरात लवकर निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घ्यावी. असे समविचारी मंचच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्र समविचारी मंचचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी श्रीनिवास दळवी महासचिव,
संजय पूनसकर राज्य सरचिटणीस, अनुप हल्याळकर, अरुण माळी, सुप्रिया भरस्वाडकर दिपा बापट कोअर कमिटी सदस्य
निलेश आखाडे. युवा आघाडी प्रमुख, रघुनंदन भडेकर. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, गिरीश जाधव, रामकांत आयरे आदी उपस्थित होते.

दखल न्यूज भारत