खिरपाणी धरणात कापुसतळणीचे दोन युवक वाहून गेले, अंधारामुळे शोध कार्यात अडथळा, तिन जण बचावले

0
372

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अंजनगाव तालुक्यातील खिरपाणी धरणात पोहायला गेलेल्या पाच युवकांपैकी दोन युवक पाण्यात वाहून गेल्याची घटना काल दि 14 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली या घटनेमुळे गावात एकच खलबळ उडाली आहे
*** कापुसतळणी येथील आकाश तायडे वय 24 वर्ष, निलेश तायडे वय 27 वर्ष, सुनिल गजानन नितनवरे वय 26 वर्ष, अंकुश साहेबराव तायडे वय 26 वर्ष, सुनिल वामन तायडे वय 26 वर्ष हे पाच युवक काल सायंकाळी अंजनगाव तालुक्यातील खिरपाणी धरणात पोहायला गेले होते
*** या पाच मित्रापैकी अचानक आकाश तायडे व निलेश तायडे धरणाच्या पाण्यात वाहून गेले तिन मित्रांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश मिळाले नाही त्यामुळे तिघेजण गावात आले व त्यांनी या घटनेची माहिती गावकऱ्याना दिली व हि माहिती गावकऱ्यांनी अंजनगाव पोलिसांना दिली घटनेची माहिती अंजनगाव पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र रात्रीची वेळ असल्याने व धरणही पहाडी भागात असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले
वाहून गेलेल्या दोन युवकांचा शोध आज घेतल्या जाईल या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून शोकलहर पसरली आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे त्यामुळे खिरपाणी धरण क्षेत्रात पाण्याचा ओघ जास्त प्रमाणात होता व त्याच पाण्याच्या प्रवाहात हे दोन युवक वाहून गेले