Home नागपूर माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते कामठीत तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासियांना...

माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते कामठीत तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

199

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी / नागपुर :१५ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी येथे 74 व्या भारतीय स्वतंत्रता दिवसा निमित्त ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री, अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या तथा माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी संपुर्ण देशवासियांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतांना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुष, क्रांतिकारी शहीद यांनी आपले बलिदान दिले. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झालीत. आज देशाची एकता, अखंडता आणि बंधुता जोपासण्यासाठी संविधान टिकविण्याची नितांत गरज आहे. सर्व धर्म समभाव व धार्मिक सद्भाव जोपासताना इतर धर्मियांना पण सोबत घेऊन चालावे लागेल. आणि ही जिम्मेदारी सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांची पण आहे. प्रत्येक भारतीयांनी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या, “मी प्रथमतः व अंततः भारतीय आहे” या विचारधारेवर चालले तरच आपला भारत देश सुजलाम सुफलाम घडेल.
याप्रसंगी हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, ओगावा सोसायटी, ड्रैगन पैलेस टेम्पल, हरदास विद्यालय, ड्रैगन इंटरनेशनल स्कूल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्र, इत्यादी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, उपस्थित होते, तत्पुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.

Previous articleकलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीचे निवेदन
Next articleखिरपाणी धरणात कापुसतळणीचे दोन युवक वाहून गेले, अंधारामुळे शोध कार्यात अडथळा, तिन जण बचावले