कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीचे निवेदन

160

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती अकोला जिल्हा, अकोट तालुका यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन अकोट तहसिलदार यांना १३ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
श्रध्देय अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी (संदर्भ क्र.so/०१/june२४/२०२०) मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाव्दारे कलावंताना आर्थिक मदत मिळणे मागणी केली होती. त्या निवेदनाचा संदर्भ देऊन महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समितीने तहसिलदारांना निवेदन दिले. २२ मार्च २०२० पासून मा. मुख्यमंत्री यांचे आदेशाने कोविड-१९ च्या महामारीमुळे संपूर्ण
महाराष्ट्रा मध्ये लॉकडाउन जाहिर करण्यात आलेला आहे. यामुळे ब-यापैकी रोजगारावर आर्थिक परीणाम झालेला आहे. अनेक औद्योगिक धंदे बंद पडलेले आहेत. अशा स्थितीत कलावंताचे संपुर्ण
कार्यक्रम बंद पडल्यामुळे त्यांच्या कडील जमा पुंजी आज रोजी संपली आहे.
पुढील दिवस कसे जातील याची प्रत्येक कलावंताना काळजी लागली
आहे. कोविड- १९ च्या जागतीक महामारीमुळे सांस्कृतीक कार्यक्रमावर बंदी
आलेली आहे. या नियमांचे पालन आम्ही सर्व करीत आहोत. त्यातच आम्ही
सर्व लोककलावंत तसेच वाद्यवृंद व गायक लोकांचे सर्व कार्यक्रम बंद
असल्यामुळे आज बेहाल होवून आमच्या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची
वेळ आली आहे. आमचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी
मा.मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाव्दारे सर्व कलावंताची (अ) यादी दिलेली
आहे. तसेच (ब) पुरवणी यादी निवेदनासोबत जोडलेली आहे.आणि श्रध्देय
अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मा.मुख्यमंत्री साहेबांना दिलेल्या निवेदनाची
प्रत जोडली आहे. तरी मा.मुख्यमंत्री साहेबांनी सर्व कलावंता कडे लक्ष देऊन
आर्थीक मदत म्हणुन प्रत्येकी रु.५०,०००/- रुपये जाहीर करुन त्यांची
अमंलबजावणी करण्याचे आदेश करावे अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती अकोट तालुका संपर्क प्रमुख सह पदाधिकारी, कलावंत यांच्या सह्या आहेत.यावेळी पं.स.सभापति लताताई नितोने,सुनिता हिरोळे, संगिताताई पोहोरकार, मंगलाताई वानखडे, श्रद्धा वानखडे, कुसुमताई पोहोरकार, मनोज तायडे, सुगत पळसपगार, दिनकर रायबोले, बाबाराव रायबोले,रमेश रायबोले,अशोक रायबोले, ॠषभ रायबोले,राहुल थोरात, राजु इंगोले,मंगलाताई अभ्यंकर, कोकीळाताई इंगळे, मंगलाताई तेलगोटे, जयश्री तेलगोटे,शत्रृघ्न नितोने, अमन गवई ,आशीष रायबोले, राहुल नितोने विक्की तेलगोटे, सदाशिव नित,राहुल नितोने, नितीन धांडे,सुनिल नितोने, मनसाराम निकाडे आदी कलाकार यावेळी उपस्थित होते .