भाजपाचा शिवसेनेला धक्का युवासेनेचे वणी तालुका प्रमुख शुभम गोरे यांचा असंख्य सैनिकांसह भाजयुमो मध्ये प्रवेश

707

 

वणी : परशुराम पोटे

भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला धक्का दिला असुन,शिवसेना प्रनित युवासेनेचे वणी तालुका प्रमुख शुभम गोरे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत भारतिय जनता युवा मोर्चा मध्ये प्रवेश केला आहे.
मा.श्री. हंसराज अहिर (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार श्री संजिवरेड्डी बोदकुरवार व श्री नितीनजी भुतडा जिल्हाध्यक्ष,भाजपा यवतमाळ जिल्हा यांच्या नेतृत्वात युवासेना तालुका अध्यक्ष शुभम गोरे यांनी युवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षात आज दि.१४ आँगष्ट् ला प्रवेश केला असुन ,शुभम गोरे यांची भारतीय जनता युवा मोर्चा वणी तालुका अध्यक्ष म्हणून निवडही करण्यात आली आहे. यावेळी आमदार श्री संजिवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे जिल्हाध्यक्ष भाजयुमो यवतमाळ व नगराध्यक्ष, न.प. वणी, दिनकरराव पावडे महामंत्री, भाजपा यवतमाळ, विजय पिदूरकर उपाध्यक्ष, भाजपा यवतमाळ, संजय पिंपलशेंडे सभापती, प.स.वणी, रवी बेलूरकर माजी शहराध्यक्ष, वणी, गजानन विधाते भाजपा तालुकाध्यक्ष वणी, प्रमोद क्षीरसागर संयोजक,सोशल मिडिया वणी विधानसभा तसेच भाजपा वणी तालुक्याचे पदाधिकारी शंकर बादुरकर,कैलाश पिपराडे,दिपक मत्ते,प्रदीप जेऊरकर,संजय झाडे,मुकेश खिरटकर,दिपक पाऊनकर संयोजक, सोशल मिडिया वणी तालुका, व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.