बँक ऑफ इंडिया चे एटीएम वाऱ्यावर (स्थानिक बँक प्रशासनाचे दुर्लक्ष )

124

कुरखेडा /राकेश चव्हाण प्र
कुरखेडा येथील मुख्य मार्गावर बँक ऑफ इंडियाचे एटीएम बँक ग्राहकांना सेवा मिळावी याकरिता कार्यरत असून या एटीएम कडे बँक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान मोकाट जनावर एटीएम च्या आत मध्ये बसून असल्याचे दिसून आले .बँक एटीएम द्वारे पैशांचा व्यवहार करणे बँकेच्या ग्राहकांना सोयिस्करपणे व्हावा या उद्देशाने शासनाने तालुकास्तरावर अशा प्रकारची सेवा देण्यास बँक प्रशासनाला एटीएम कार्यरत केले आहेत परंतु या बँकेच्या एटीएम च्या सुरक्षेविषयी व देखभाल विषयी बँक प्रशासन सुस्त आहे, त्यांचे एटीएम कडे दुर्लक्ष आहे. एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर असून इथे कोणताही सुरक्षारक्षक जबाबदारी पार पाडताना दिसत नाही राज्यात एटीएम फोडल्याचे भरपूर प्रकरणे होत असल्यानंतरही बँक व्यवस्थापना ने याचे सुरक्षेविषयी लक्ष दिलेले नाही.तरी बँक व्यवस्थापनाने त्वरित सुरक्षा रक्षक ची नेमणूक करावी.