अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज वतीने क्षेत्र कार्य अंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय शाळा आमगाव येथे बालीका दिन साजरा

 

हर्ष साखरे उपसंपादक

आमगाव:- आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आमगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती चे अवचित साधून ” बालिका दिन ” कार्यक्रम घेण्यात आले . सोबतच अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वडसा येथील एम. एस. डब्ल्यु . प्रथम वर्ष भाग एक चे विद्यार्थी यांचे कडून कोरोनाच्या धर्तीवर हात धुण्याचा कार्यक्रम तसेच सर्व विद्यार्थ्याना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खुने मॅडम ( शिक्षिका ) , उद्घाटक म्हणून मा. उइके सर ( केंद्रप्रमुख ) तथा प्रमुख पाहुणे मा. शेंदरे सर ( मुख्याध्यापक ) व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . सदर कार्यक्रमात काही विद्यार्थिनी यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे दिली . तथा मंचवरील उपस्थितांनी मार्गदर्शन पर भाषणे दिली . यानंतर कार्यक्रमादरम्यान अनिकेत समाजकार्य महाविद्यालय यांच्या विद्यार्थी यांचे कडून सर्व विद्यार्थ्याना मास्क व एका वर्गाला एक सॅनिटायझर देण्यात आले यावेळी एम. एस. डब्ल्यु . प्रथम वर्ष चे विद्यार्थी प्रविण काळबांधे यांनी कोरोंना यावर प्रतिबंध करावयाची काळजी याबाबत माहिती दिली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . सदर कार्यक्रमाचे संचालन एम. एस. डब्ल्यु . प्रथम वर्ष चे विद्यार्थी चेतन बांबोळे यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती नरोटे मॅडम ( जि. प . शिक्षिका ) व आभार एम. एस. डब्ल्यु . प्रथम वर्ष चे काजल भाजीपाले यांनी केले सदर कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरिता एम. एस. डब्ल्यु . प्रथम वर्ष चे विद्यार्थी डेनी अंबोरकर व सबीता परसमोडे यांनी सहकार्य केले .