चंगळवादात न अडकता युवावर्गाने ध्येयाकडे लक्ष द्यावे पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांचे प्रतिपादन

 

उपसंपादक /अशोक खंडारे

आजची पिढी ही व्हाट्सअप ,फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये अधिक अडकली आहे.त्याग करणारे समाजसुधारक, आई-वडील यांच्या कार्याचा विसर पडलेला आहे. त्यामुळे आजच्या या पिढीने चंगळवादात न अडकता ध्येयाकडे लक्ष देऊन अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत ,असे प्रतिपादन आष्टी येथील पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे -सावंत यांनी केले. त्या वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तथा ग्रंथालय विभाग व युनीक अकॕडमी नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते. तर प्रमुख अतिथी प्रा.डाॕ. राजकुमार मुसने,डाॕ. गणेश खुणे, डाॕ.रवी शास्ञकार, प्रा. रवी गजभिये, प्रा. श्याम कोरडे ,प्रा. ज्योती बोबाटे,प्रा नासिका गभणे, प्रा विजया सालूरकर, आकाश निमसरकार आदी उपस्थित होते .पुढे बोलताना मा.वैशाली कांबळे यांनी विद्यार्थ्यांना वाईट विचार डोक्यातून काढून स्वतःला घडवलं पाहिजे ,ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करून स्वतःलाच प्रगल्भ केले पाहिजे, पदवी शिक्षणासोबतच एमपीएससीची तयारी केली पाहिजे,एमपीएससी हा एक प्रकारचा नाद आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे ध्येय बाळगत जिद्दीने मनोबल ठेवत संयमाने तयारी केली पाहिजेअसे मार्गदर्शन केले.तद्वतच प्रामाणिकपणे आतून पेटत विशिष्ट फोकस ठेवून जिद्यीने यश मिळवण्यासाठी धडपड करावी.युवकातील
उर्मीचे रूपांतर ध्येयसिद्धी मध्ये करून यशस्वी होण्याचा मूलमंत्र वैशाली कांबळे यांनी दिला. स्वतःच्या जीवनातील विविध अनुभव स्पर्धा परीक्षेची तयारी व यशानंतरचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य संजय फुलझेले यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकाधिक सहभाग घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन आचल मडावी व पायल मडावी यानी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मी ठाकूर हिने तर मनोगत निखिता चौधरी हिने व उपस्थितांचे आभार हर्षा तिमांडे हिने मानले. कार्यक्रमप्रसंगी जर सावित्री नसती तर मुली शिकल्या नसत्या या गीताचे बहारदार गायन विद्यार्थ्यांनी करून वातावरण निर्मिती केली.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व प्राध्यापकवृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.