कोरोनाची भीती कायम ! जिल्ह्यात करुणा रुग्णांचा आकडा 17 हजार 100 च्या वर

125

जळगाव जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र न्हावी
जळगाव- गेल्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही 2 हजार च्या वरती पोहोचली असून आज परत जिल्ह्यात 500 च्या वर कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण बळीची संख्या ही 600 च्या वरती पोहोचलेली आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्याही 17 हजार 100 पर्यंत पोहोचली आहे. व 11 हजार 500 च्या वर रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहे.