पोलिसांना शिवीगाळ करणे पडले महागात, आमदार राजू कारेमोरे यांना अटक

शेखर इसापूरे,
विभागीय प्रतिनिधी, नागपूर
दखल न्यूज, भारत

भंडारा – जिल्हाच्या तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत धिगांणा घातला.

आमदार राजू कारेमोरे धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. मारहाण झालेल्या दोन व्यापाऱ्यांनी पोलिसांनी 50 लाख रुपये रोख आणि सोन्याची साखळी चोरून नेल्याचा आरोप केला. तसेच विनाकारण मारहाण केल्याची तक्रार दिली होती. तर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याची तक्रार पोलिसांनी नोंदविली होती. दोन दिवसाच्या चौकशीनंतर आज राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आलेली आहे. भंडारा येथून अटक करून त्यांना मोहन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना मोहाडी येथील न्यायालयात हजर करणार आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे रात्री 9 वाजता आमदारांच्या घरून 50 लाखांची रोकड घेऊन चारचाकीने तुमसरकडे घेऊन जात होते. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी वाहनातील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. त्यांच्या जवळील 50 लाख रुपयांची रक्कम आणि सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पोलीस अधिकाऱ्याची तक्रार करणार- आमदार कारेमोरे
बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उप निरीक्षक राणे यांनीदेखील शासकीय कामात अडथळा करीत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी खाकी वर्दी घालून दबंग गिरी करणाऱ्या पोलीस उप निरीक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.