चंद्रपुरात कोरोना प्रोझिटिव्ह रुग्णाची संख्या हजारी पार…..

0
291

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1027 झाली आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 39 बाधिताची नोंद झाली आहे. काल सायंकाळी 988 असणारी बाधितांची संख्या आज 1 हजार 27 वर पोहोचली आहे. यापैकी 609 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून 409 बाधितावर उपचार सुरू आहेत.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 17, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील 5, गडचांदूर येथील 2, बल्लारपूर शहरातील 6, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आणि ब्रह्मपुरी येथील प्रत्येकी एक, राजुरा दोन तर वरोरा येथील तीन असे एकुण 39 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील पोलिस कॉर्टर तुकुम परिसरातील तीन, सीटीपीएस रोड परिसरातील एक, कोंडी वार्ड नंबर 5 येथील दोन, दडमल वार्ड सोमेश्वर मंदिर परिसरातील तीन, जटपुरा गेट परिसरातील एक, बालाजी वॉर्ड नंबर 2 येथील दोन, वेटर्नरी वार्ड येथील दोन, इंदिरानगर येथील एक, चोर खिडकी येथील एक, जगन्नाथ बाबा नगर परिसरातील एक, पठाणपुरा परिसरातील एक बाधित पुढे आलेले आहेत.चंद्रपूर तालुक्यातील घुघुस येथील 5 बाधित पुढे आले आहेत.
गडचांदूर येथील दोन पॉझिटिव्ह ठरले आहे. विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथील दोन, गोकुळ नगर येथील तीन तर बल्लारपूर शहरातील एक पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
पोंभुर्णा येथील एक, गोंडपिपरी येथील एक, ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील एक, सावली तालुक्यातील हिरापूर येथील एक, राजुरा येथील कर्नल चौक परिसरातील एक, आंबेडकर वार्ड राजुरा येथील एक बाधित पुढे आलेले आहेत.
वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील एक तर वरोरा शहरातील दोन बाधित ठरले आहे.