गडचिरोली जिल्हयात आज 26 कोरोनामुक्त, नवीन 15 बाधित

123

 

संपादक जगदीश वेन्नम

गडचिरोली,(जिमाका)दि.14: जिल्हयात आज 24 तासात 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामध्ये ग्यारापत्ती येथील 11 सीआरपीएफ, एटापल्ली हेडरी येथील 7 एसआरपीएफ, गडचिरोली येथील 4 नागरिक, अहेरी येथील 3 नागरिक तर धानोरा मधील एक पोलीस जवान कोरोनामुक्त झाला. यामुळे जिल्हयातील कोरोनामुक्त रुग्णांची आकडेवारी 656 झाली.
आज नव्याने 15 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये ग्यारापत्ती येथील 4 सीआरपीएफ अंकिसा सिरोंचा येथील मागील रुग्णाच्या संपर्कातील विलगीकरणात ठेवलेले 5 जण व रंगनापेठ येथील रुग्णाच्या संपर्कातील 2 जण बाधित मिळाले. मुलचेरा येथील एकजण राजस्थान येथून आला होता. त्याला विलगीकरणात ठेवले होते. तो बाधित आढळून आला. भामरागड येथील मागील रुग्णाच्या संपर्कातील विलगीकरणात ठेवलेले दोघे कोरोनाबाधित आढळून आले. एक सीआरपीएफ हेडरी एटापल्ली येथील कोरोना बाधित आढळून आला.
यामुळे जिल्हयात एकूण 816 बाधित झाले. सद्या त्यापैकी सक्रिय 160 आहेत. तर 656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.