Home क्राइम घुग्घुस पोलिसांच्या धडाकेबाज कारवाई दरम्यान पंधरा लाखाचा देशी आणि विदेशी दारूचा साठा...

घुग्घुस पोलिसांच्या धडाकेबाज कारवाई दरम्यान पंधरा लाखाचा देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त दारू माफियां वर राजकीय वरदहस्त कोणाचा ?

438

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
दिनांक 12 ऑगस्टच्या रात्री घुग्घुस पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळून एकूण पंधरा लाख चार हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात यश मिळवले .यवतमाळ – चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बेलोरा पॉईंट या तपासणी नाकयावर गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या तपासणी दरम्यान सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचारयांनी स्कॉर्पिओ वाहन वणी कडून चेक पोस्टवर आले असता सदर वाहन चालकास वाहन थांबवण्यास सांगितले असता वाहन रोड रोडच्या बाजूला थांबवले .वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण शंभर पेटी देशी व विदेशी दारूचा साठा गवसला.
जप्त केलेल्या मुद्देमाला मध्ये एक लाख 44 हजार रुपये किमतीची 10 पेटी विदेशी दारू व 4 लाख 50 हजार रुपये कीमती ची एकूण 90 पेटी विदेशी दारू सोबतच नऊ लाख रुपयाचे स्कॉर्पिओ वाहन तसेच दहा हजार रुपये किमतिचा मोबाईल असा एकूण पंधरा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. सदर कारवाईत एकूण पाच आरोपींवर कलम 65 अ , 83 मु. दा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी नामे राजू शंकर आत्राम वय वर्षे 22 व शंकर श्रीराम कोवे वय वर्षे 19 दोघेही राहणार वणी जिल्हा यवतमाल यांना अटक करण्यात आली आहे. सदर दारू साठा हा चंद्रपुर येथील मुख्य माफ़ियास सप्लाय करण्यास नेन्यात येत असल्याची चर्चा आहे.
सदर कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सचिन डोये, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश करमे व पोलिस कॉन्स्टेबल मंगेश निरंजने यांच्या द्वारे घुग्घुस चे ठाणेदार पोलिस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. मागील काही दिवसात घुग्घुस परिसरामधील देशी-विदेशी दारू चा छडा लावून जप्त करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला असून या कार्यवाही मुळे संपूर्ण परिसरातील दारू माफिया व या परिसरातून दारू पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या माफिया मध्ये घबराट पसरली असल्याचे चर्चा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कार्यवाही होऊन सुद्धा परिसरात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणारी अवैध दारू ही कोणाच्या राजकीय आशीर्वादाने विकल्या जात आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

Previous articleकोरोनाच्या महामारीत क्रेंद्र शासनाने पेट्रोल – डिझेल मध्ये केलेल्या प्रचंड अश्या दरवाढीचा विरुध्द नागभीड तालुका युवक काँग्रेस तफे निवेदन सादर
Next articleगडचिरोली जिल्हयात आज 26 कोरोनामुक्त, नवीन 15 बाधित