जिल्हाधिकारी यांनि वीज समस्या मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

194

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 14 ऑगस्ट
तालुक्यात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले होते वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी 4 ऑगस्टला 10 तास कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन होते . आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ व्हीसी द्वारे चर्चा करून कोरची येथील वीज समस्या व इतर समस्यांची पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्यालय गडचिरोली येथे व्हिसी द्वारे विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक अरविंद भादोकर यांच्याशी चर्चा करून वीज वितरण कंपनीचे संपूर्ण समस्या मार्गी लावले.
यावेळी आमदार कृष्णा गजभे, सुहास रंगारी प्रादेशिक संचालक वीज वितरण कंपनी नागपूर, सुनिल देशपांडे मुख्य अभियंता चंद्रपूर, सम्राट वाघमारे अधिक्षक अभियंता गोंदिया परिमंडळ ,अनिल बोरसे अधिक्षक अभियंता गडचिरोली, विजय मेश्राम कार्यकारी अभियंता गडचिरोली सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष शामलाल मडावी, सचिव नंदकिशोर वैरागडे, मनोज अग्रवाल, सदरुददीन भामानी, आनंद चौबे, प्रा देवराव गजभिये, सदाराम नुरूटी, सहायक अभियंता प्रफुल्ल कुरसंगे उपस्थित होते
कोरची कुरखेडा अंडरग्राउंड विद्युत पुरवठा साठी 7 कोटी रूपये तात्काळ मंजूर करण्याची आश्वासन दिले, कोडगुल येथील 33 टीव्ही सब सेंटर साठी पाच कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्याची आश्वासन दिले,कोरची येथे बीएसएनएल चे नेटवर्क भारतीय दूरसंचार विभाग पूर्ण करू शकणार नाही अशी खंत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी व्यक्त केली असून आपल्या अधिकार क्षेत्राच्या येत नसले तरी जिओ चे टावर उभे करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर ती प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, तर कोरची येथे एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने ग्राहकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेचे बोलून व पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्याकडून कोरची येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा ओपन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्या मुळे कोरची तालुक्यात आता समस्या मार्गी लागतील अशी आशा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे.