सिंदेवाही पंचायत समिती चा अजब खाक्या. १९८६ पासुन, हातपंप दुरूस्ती यांत्रीकी या पदावर कार्यरत कर्मचारी निभावतात सफाई कामगारांची भुमिका.

0
150

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती निहाय हातपंप दुरूस्ती यांत्रीकी यांचे पथकाद्वारे प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील नादुरुस्त हातपंपाचे दुरूस्ती ची कामे हातपंप दुरूस्ती यांत्रीकी यांचे पथकाद्वारे दुरूस्ती करून, ग्रामपंचायत स्तरावर जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येऊन, जनतेचा पाण्याचा प्रश्ण मिटवायचे‌ महत कार्य हातपंप दुरूस्ती पथकातील यांत्रीकी हे सातत्याने करीत असल्याचे आपल्याला नेहमीच दिसून येते. परंतु त्या यांत्रीकी कर्मचाऱ्यांची नेहमीच उपेक्षा केली जात आहे.
सिंदेवाही पंचायत समितीला असेच हातपंप दुरूस्ती यांत्रीकी कर्मचाऱ्यांचे एक पथक असून, त्यात १) दशरथ काशिनाथ भांडारकर २) मधूकर सोनूजी गेडाम ३) दिवाकर नागो पेंदाम ४) पुणाजी खेमाजी गुरनूले त्यांचेकडून दरवर्षी शासकीय ध्वजारोहण निमीत्ताने ‌पंचायत समिती कार्यालयांचे आजूबाजूला असलेला कचरा साफ करायला लाऊन, संवर्ग विकास अधिकारी यांचेकडून त्यांचेवर अन्याय केला जात आहे. ते बिचारे अधिकाऱ्यांनी सांगितलेले काम निमुटपणे करण्यास तत्पर असतात. हा भाग वेगळा, कारण त्यांना अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करण्यापलीकडे कांही सुचतच नाही. त्यामुळे त्यांची गत अशी झाली आहे की, “इकडे आड आणि तिकडे विहीर” या दुहेरी कैचीत सापडल्याने त्यांचे असे होऊन बसले आहे की, “कहू तो मा मर जाये, ना कहू तो बाप कुत्ता खाये”कारण त्यांचा वाली कुणीच नाही, असे समजून त्यांचे मुलभूत अधिकारावर गदा आणल्या जात आहे. त्यामुळे अधिकारी जे काम सांगतील ते मुकाट्याने करत सहन करायचे आहे. त्याशिवाय त्याचेकडे कोणताही पर्याय उरलेला नाही, असा त्यांचा समज झालेला आहे. त्यांनी तो गैरसमज दूर करून अधिकाऱ्यांशी आपल्या अधिकाराबाबत बोलायला शिकले पाहिजे.