पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्युज भारत
देसाईगंज- दि. १४/०८/२०२० देसाईगंज तालुक्यातील सावंगी-गांधीनगर गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, देसाईगंज अंतर्गत – “जागर अस्मितेचा” मोहीम अंमलबजावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीची रॅली सावंगी- गांधीनगर या गावात काढण्यात आली. “अस्मिता योजना, माझा गौरव, माझा हक्क” या ब्रिदवाक्याचा घोषणा करून जनजागृती रॅलीला सुरवात करण्यात आली.
अस्मिता योजना म्हणजेच काय? मासिक पाळीचे नियोजन कशा प्रकारे करायचे? याबाबत महिला, किशोरवयीन मुलींना अस्मिता योजनेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन (पॅड) चे कमीत-कमी पैशात स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून मिळेल. या बद्धल या योजनेतून किशोरवयीन मुली, महिलांमध्ये जनजागृती आणि मासिक पाळी स्वच्छतेबद्धल, मार्गदर्शन पर जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी सावंगी-गांधीनगर ग्राम संघ पदाधिकारी नैना प्रधान, अरविंदा नंदागवळी, आयसीआरपी इंदू गेडाम, कविता राऊत, नलू बनकर, पशुसखी, चंदा प्रधान, रीना तुपटे, कृषी सखी मंजुषा नंदापुरे, करिष्मा सोंदरकर, बँक सखी पुष्पा बुल्ले, एफएलसीआरपी सीमा कुंभरे, सीटीसी अल्का बुल्ले, गावातील अंगनवाडी सेविका कमल लोणारे, लालन मेश्राम मदतनीस व स्वयं सहायता गटातील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.