गड़चिरोली जिल्हा युवक काँग्रेस चे अनोखे आंदोलन, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चा वतीने केंद्र सरकार चा 20 लाख कोटींचा पर्दाफाश

132

 

रोशनी बैस
कार्यकारी संपादिका

गड़चिरोली दि 14ऑगस्ट- जिल्हा युवक काँग्रेस ने “कहा गये वो 20 लाख करोड” हे आंदोलन करण्यात आले व छोटे व्यावसायिक व्यापारी, शेतकरी व बेरोजगार सोबत संवाद साधुन त्याचा कडून केंद्र सरकारच्या पॅकेज चा लाभा संदर्भतील वस्तू स्थिती जाणून घेण्यात आली.
गेली ६ वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असून या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.आज आपल्या देशाने बेरोजगारीचा उच्चांक गाठला आहे.कोरोनाच्या संकटकाळातील अनियंत्रित व ढिसाळ कारभारामुळे युवकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची तर अनेकांवर आत्महत्येची वेळ आली आहे.तर काही व्यसनाच्या व गुन्हेगारीच्या मार्गावर आहेत. लघु व मध्यम उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत.केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेज पैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगांसाठी जाहीर केले होते.व केंद्रीय अर्थमंत्री मा.सीतारमण यांनी मीडियामध्ये मोठा गाजावाजा करून ते जाहीर देखील केले होते.परंतु यातील कुणालाच काहीच मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे त्या प्रमाणे शेतकऱ्यांना देखील काहीच मदत मिळाली नाही . म्हणून गड़चिरोली जिल्हा युवक काँग्रेस नी केंद्र सरकारचा 20 लाख कोटीचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा भाजप कार्यालय समोर शांतातापूर्ण आंदोलन केले. देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटि चे पैकेज ची घोषणा केली होती.याच हिशोब विचारत युवक काँग्रेस कार्यकर्ता यांनी खासदार अशोकजी नेते यांच्या कार्यलया समोर जाऊंन नारे बाजी करुण जॉब विचारल. यावेळी आंदोलनात जिल्हा युवक अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव, अतुल मल्लेलवार, जिल्हा महासचिव आशीष कन्नमवार,महासचिव कुणाल पेंदोरकर,महासचिव नितेश राठोड,वसंत राउत, दिवाकर मिसार, ढिवरु मेश्राम, गौरव अलाम,निखिल खोब्रागडे,गौरव एनपरेड्डीवार, घनश्याम मुरवतकर, वैभव कडसकर सह युवक काँग्रेस कार्यकर्ता उपस्थिति होते.