महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चा वतीने केंद्र सरकार चा 20 लाख कोटींचा पर्दाफाश

0
120

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत

देसाईगंज- आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस देसाईगंज ने कहा गये वो 20 लाख करोड हे आंदोलन करण्यात आले व छोटे व्यावसायिक व्यापारी, शेतकरी व बेरोजगार सोबत संवाद साधुन त्याचा कडून केंद्र सरकारच्या पॅकेज चा लाभा संदर्भातील वस्तू स्थिती जाणून घेण्यात आली. गेली ६ वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार असून या सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांमुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. आज आपल्या देशाने बेरोजगारीचा उच्चांक गाठला आहे. कोरोनाच्या संकटकाळातील अनियंत्रित व ढिसाळ कारभारामुळे युवकांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची तर अनेकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तर काही व्यसनाच्या व गुन्हेगारीच्या मार्गावर आहेत. लघु व मध्यम उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेज पैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगांसाठी जाहीर केले होते. व केंद्रीय अर्थमंत्री मा. सीतारमण यांनी मीडियामध्ये मोठा गाजावाजा करून ते जाहीर देखील केले होते. परंतु यातील कुणालाच काहीच मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. त्या प्रमाणे शेतकऱ्यांना देखील काहीच मदत मिळाली नाही. म्हणून आरमोरी विधानसभा युवक काँग्रेस देसाईगंज नी केंद्र सरकारचा 20 लाख कोटीचा पर्दाफाश करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे आरमोरी विधानसभा भाजप यांच्या कार्यालय समोर शांतातापूर्ण आंदोलन केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटि चे पैकेज ची घोषणा केली होती. याच हिशोब विचारत युवक काँग्रेस कार्यकर्ता यांनी आमदार कृष्णा गजबे यांच्या कार्यालया समोर जाऊंन नारे बाजी करुण जॉब विचारले. यावेळी आंदोलनात विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेसचे मिलींद खोब्रागडे, कमलेश बारसकर विधानसभा आरमोरी उपाध्यक्ष, पिंकु बावणे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष देसाईगंज, नितीनभाऊ घुले ओ.बी.सी शहर अध्यक्ष देसाईगंज, निलेश अंबादे महा सचिव, लतीफ रिजवी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, सुरज सोमनकार, कैलाश बन्सोड, मंगल गराडे, विकी सीडाम, भारत गराडे, सुरज जोंजलकर, सौरभ उंदिरवाडे, वैभव भागरकड, विलास ढोरे, गिरीश देशमुख सह युवक काँग्रेस कार्यकर्ता उपस्थितीत होते.