अकोल्यात भाजपा कार्यालयासमोर युवक काँग्रेस चा पर्दाफाश आंदोलन

102

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस द्वारे प्रदेशाध्यक्ष मा.सत्यजीतदादा तांबे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात कहा गए वो २० लाख करोड़ मोहीमेंअंतर्गत केंद्र सरकार विरोधात आंदोलन घेण्यात आले.गेल्या ५ दिवसांमधे समाजातील प्रत्येक घटकासोबत संवाद साधुन त्यांना केंद्र सरकारच्या २० लाख कोटिंच्या पैकेजमधील लाभ मिळाला का?याची प्रत्यक्षात माहिती घेण्यात आली.तसेच आज या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात अकोला येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेस द्वारे निदर्शने करण्यात आली.यावेळी प्रदेश पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.