वणी:- परशुराम पोटे
स्वातंत्र्य दिना निमित्ताने सर्व नागरिकांसाठी श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत सहजयोग ध्यानकेंद्र प्रतिष्ठान पुणे येथुन ऑनलाईन ध्यानाचा भव्य कार्यक्रम रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता लर्निंग सहजयोगा या यूट्यूब चॅनेलवर विनामूल्य लाईव्ह प्रसारीत केला जाणार आहे.
आयुष्यात बदल घडविणारा , निरोगी व संतुलित जीवनशैलीसाठी, आंतरिक कार्यक्षमता वाढविणारा, सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासासाठी शास्त्रीय पद्धतीने सहजयोग ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव सर्व वयोगटातील नागरिकांनी आपल्या हितासाठी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहजयोग समन्वयक स्वप्निल धायडे यांनी केले आहे.
सहजयोग ध्यान- आयुष्य घडविण्यासाठी या कार्यक्रमात भारत मातेच्या गौरवार्थ देशभक्तीपर गीते, माय लाईफ -माय मेडिटेशन द्वारे आयुष्य बदललेल्या प्रेरणादायी पाच जीवन कहाण्या- प्रत्यक्ष कथन, आत्मसाक्षात्कार व ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव आणि घरी कसे ध्यान करावे यावर मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
आजच्या बदललेल्या परिस्थितीत आरोग्याच्या समस्या , शरीराची दुखणं , अपेक्षित यश न मिळण्याची भीती, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, ताण तणाव, अपेक्षांचे ओझे, नकारात्मक विचार, चिड चिड होणे, राग येणे , नातेसंबंधात तणाव , अतिविचार, कामात लक्ष न लागणे अशा अनेक आधुनिक समस्या दैनंदिन जीवनात आहेत. तुम्हाला देखील या समस्या जाणवत आहेत का? मग या समस्यांचा सामना करायला आपल्या शरीरातील सुप्त शक्ती च्या जागृतीद्वारे (स्व – च्या तंत्राद्वारे ) ध्यानाने स्वपरिवर्तनाची सुरवात या माध्यमातून होते.
श्री माताजी निर्मालादेवी यांनी सुरू केलेल्या दैनंदिन सहजयोग ध्यानाद्वारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून संतुलित आणि यशस्वी आयुष्य अनुभवत आहे. सदर कार्यक्रमात सहजयोग ध्यानाद्वारे होणारे फायदे – सकारात्मक विचारशैली, ताणतणाव कमी होते. आत्मविश्वास वाढतो, आरोग्याची काळजी, रोग प्रतिकार शक्ती वाढते, चित्ताची एकाग्रता वाढते, चिडचिड कमी होते. मुलांची अभ्यासात प्रगती होते, नैराश्य दूर होते. यावर आभासी माहिती दिली जाईल व ध्यानाद्वारे प्रात्यक्षिक केले जातील.
लॉकडाऊनच्या काळात हजारो नागरिकांनी सहजयोग ध्यानाचा फायदा घेतला आहे आणि दैनंदिन ध्यान करून स्वत: मध्ये संतुलन अनुभवत आहेत .
यु ट्यूब चॅनेल www.youtube.com/c/learningsahajayoga यावर हा मोफत कार्यक्रम सर्वांनी रविवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा बघावा. कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रं 1800 30 700 800 वर संपर्क करावा असे आवाहन सहजयोग परिवारातर्फे करण्यात आले आहे.