भामरागड नजीकचे पर्लकोटा नदी फुगली, काही वेळात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याची शक्यता

219

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम: पर्लकोटा नदीचा जलस्तर वाढला असूून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही वेळात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी पडून मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी भामरागडला पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यावर्षी पावसाला पाहिजे तेवढा जोर नसल्यामुळे भामरागडचा अजूनपर्यंत जगाशी संपर्क तुटलेला नाही. परंतु आज पर्लकोटा नदीचे पाणी वाढत असून काही वेळात मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली असून नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.