नागपुर च्या बोखारा गणेश नगरी मध्ये कोरोना मुळे एकाचा मृत्यू

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

गणेश नगरी – बोखारा / नागपुर :१४ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील नागपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या बोखारा ग्रा पं हद्दीतील गणेश नगरी येथील ४२ वर्षिय व्यक्ति चा कोरोना मुळे म्रृत्यु झाला आहे.
ह्या ४२ वर्षिय व्यक्तीला शुगर चा त्रास होता तसेच ४ दिवसांपासून त्याला ताप सुद्धा होता. प्राप्त माहितीनुसार त्या व्यक्तीने ४ दिवसापासुन शुगर च्या गोळ्या खाल्या नव्हत्या. त्याचा शुगर हा ३००-४०० पर्यत वाढला होता तसेच त्याला खुप ताप होता आणि काल जेवण केले नव्हते. अशी माहिती या व्यक्तीच्या मित्राने दिली.
या व्यक्तीच्या मुलीने माहिती दिली की, रात्री तिच्या वडिलांना बरे वाटत नव्हते म्हणून त्यांना नागपूर च्या एलेक्सिस हाँस्पिटल ला भर्ती केले उपचारादरम्यान १० मिनिटे वेंटिलेटर वर त्यांच्या ह्रदयाचे पल्स सुरु झाले होते. पण नंतर त्यांचा म्रृत्यु झाला असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. मात्र त्यांचा म्रृत्यु हा अटैक नेच झाला असा दावा त्यांनी केला.
एलेक्सिस हाँस्पिटल प्रशासनाने या व्यक्तीची कोरोना रैपिड टेस्ट केली असता रिपोर्ट पाँजिटीव आल्याने त्यांची कोरोना पाँजिटीव डेथ डिक्लेअर केली.
गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल राऊत, तसेच आरोग्य सेवक बी पी सुरकार, हेमलता गजभिये(ANM) , सुपरवायझर विद्या भिंगारे, सम्रृद्धी निंबाते (आशा वर्कर) आदी गणेश नगरी येथे कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी पोहोचून त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली . या व्यक्तीच्या घरात एकुण ८ जण असुन सर्व हाय रिस्क कैंडिडेट आहेत. हा व्यक्ती कैटरिंग चा व्यवसायासोबतच मायनिंग मध्ये ठेके घ्यायचा अशी माहिती मिळाली. या व्यक्तीच्या घरातील सर्व ८ जणांना महादुला नगरपंचायत येथे कोरोना टेस्ट करण्यासाठी पाठवले असुन त्यांची रिपोर्ट काय येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हा व्यक्ती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला सुद्धा गेला होता काल परवा. आणि हा खुप जणांच्या संपर्कात ही होता असेही बोलले जाते. या व्यक्तीच्या संपर्कात असणांनांनी आपापल्या टेस्ट करुन घ्याव्यात असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. बोखारा ग्रा पं ला यांबाबत अजुनही कुठली माहिती मिळाली नसल्याचे समजते. त्यामुळे अजुन तरी या एरियात सेनिटायजर ची फवारणी झालेली नाही.