धानोरा फाटा येथील शाहा कोल कंपनीतील वाहन चालकाचा झोपेतच मृत्यु

205

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या घुग्घुस -चंद्रपूर मार्गा वरील धानोरा गा
फ़ाटयां जवळ शाहा कोल प्रा.ली.कंपनी असून या कंपनीत वाहन चालक सुनील चौधरी काम करीत होता. बुधवारला वेकोलि च्या पैनगंगा खदाणीतून हायवा ट्रक क्रमांक एम एच 34 एबी 6703 या वाहनांनी कोळसा भरून कोल डेपोत आणला व वजन करून रात्री वाहनातच जेवण करून झोपला मात्र आज सकाळी तेथील कामगार त्याला उठवण्यासाठी गेला असता तो मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बीआरएसपी चे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश पाईकराव यांनी घटना स्थळ गाठून शाह कोल कंपनी कडून मृतकाच्या पत्नीला 25 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी,अंत्य संस्कारासाठी नगदी 50 हजार देण्यात यावे व त्याच्या दोन लहान मुलांना दरमहा वेतन देण्यात यावे या मागणी करिता चक्का जाम केले . यावेळी येथील शाहा कंपनीचे सर्व ट्रक चालक सुद्धा सहभागी होऊन मृतकाच्या परिवारास सहकार्य केले . घटने चे गाम्भीर्य बघता शहा कोल कंपनीने अंत्य संस्कारासाठी पन्नास हजार दिले. तसेच पंचेवीस लाख व दोन लहान मुलांना दरमहा वेतन देण्याची मागणी कंपनीच्या संचालकांनी मंजूर केली असल्याचे माहिती मिळाली आहे .मात्र शहा कोल कंपनी ने आर्थिक मदत देण्यास दिरंगाई केल्यास बीआरएसपी कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पाईकराव यांनी दिला आहे .याप्रसंगी अमन पाटील, अशोक आसमपल्लीवार, जगदीश मारबते, योगेश नगराले, राकेश काटकर, सागर बिराडे, विलास पचारे, राकेश पारशीवे, राजेंद्र थेरे, सुमित फुलकर, व करणं बिराडे व आजुबाजुच्या गावातील नागरिक उपस्थित होते.